Girish Mahajan Vs Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी लोकसभा, विधानसभेत निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

गिरीश महाजन, एकनाथ खडसे,www.pudhari.news
गिरीश महाजन, एकनाथ खडसे,www.pudhari.news

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कोणाच्या सांगण्यावरून छापेमारी होत नाही. तुम्ही काही केले नसेल, तर घाबरायचे कारण नाही. देशात स्वच्छता मोहीम सुरू आहे, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तोंडाच्या वाफा सोडू नये. त्यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे, असे थेट आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. Girish Mahajan Vs Eknath Khadse

बारामती ॲग्रो वन छापे सुरू आहेत. रोहित पवारांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे हे गिफ्ट आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री महाजन यांना केला असता त्यावर ते म्हणाले की, छापेमारी संपूर्ण देशभर सुरू आहे. मोठमोठे लोकांवर आहे. त्यामध्ये चुकीचे काय आहे. तुम्ही काही केले नसेल, तर घाबरायचे कारण नाही. देशभर स्वच्छता मोहीम चाललेली आहे. त्यामुळे राजकीय आकसातून कारवाई केल्याचा गैरसमज पसरविण्याचे काम करू नये. Girish Mahajan Vs Eknath Khadse

राज्यातील सरकार अपयशी असल्याचा टोला खडसेंनी लगावला आहे. यावर उत्तर देताना महाजन म्हणाले की, खडसेंनी लोकसभा किवा विधानसभा लढवावी, नुसत्या तोंडाच्या वाफा सोडू नये. सरकार अपयशी आहे की नाही हे मतदार निवडणुकीत दाखवून देतील. लोकसभा निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नाही. परंतु, पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पार पाडेल, मला कुठेही सत्तेची हाव नाही. पक्षाचा शिलेदार म्हणून पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारू, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे डीएनए टेस्ट करावे लागेल. ते मतांचे राजकारण करीत आहेत. मतांच्या लालसेपोटी बोलतात. कारण त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक मतदार आहेत. मते घेण्यासाठी ते बेछूट काहीही बोलतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत कितीही जागा घ्याव्यात, मात्र त्यांनी एकतरी जागा निवडून आणून दाखवावी, असे आव्हान महाजन यांनी यावेळी दिले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news