जळगाव : पाठलाग करुन पाच जणांना घेतलं ताब्यात, सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त | पुढारी

जळगाव : पाठलाग करुन पाच जणांना घेतलं ताब्यात, सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगाव- धुळे रस्त्यावरून चाळीसगाव कडे येणाऱ्या छोट्या हत्तीला पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शहराकडे वाहन वाढविले. पोलिसांनी पाठलाग करून वाहनासह पाच जणांना ताब्यात घेतले असून सव्वा दोन लाखाचे पाईप पोलिसांनी जप्त केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, (दि. 4) रोजी नियमितपणे चाळीसगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त गलत होते.
सफौ शशीकांत महाजन, पोना नितीश पाटील, पोशि संदीप पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहेकॉ प्रशांत पाटील, पो.ना दिपक पाटील, पोशि अमोल भोसले, अजय पाटील, नंदकिशोर महाजन, मोहन सुर्यवंशी आदींचे पथक गस्त करीत होते. पोलीस नाईक दिपक पाटील यांना रात्री ३:४५ वाजेला धुळे रोडवरील साने गुरुजी शाळेसमोर रोडवर मेहुणबारे गावाकडुन चाळीसगाव शहराकडे एक टाटा चा (छोटा हत्ती) भरधाव वेगाने येतांना दिसला. त्यास थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. तेव्हा पोलीस पथकाचा त्या वाहनावर अधिक संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहनास पुन्शी पेट्रोल पंपाच्यापुढे थांबविले. त्या वाहनामध्ये मागे बसलेले तीन व्यक्ती पैकी पोलीसांना पाहताच दोन इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. वाहन चालका जवळ तीन जण बसलेले होते. पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केली. त्यात जल पुरवठा वाहिनीसाठी वापरण्यात येणारे, लोखंड मिश्रीत बिड धातुचा एक पाईप तसेच त्या पाईपाचे तुकडे दिसले. सदर पाईप कोठुन आणले याबाबत व पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे दिली. पाईप हा कोठूनतरी चोरी करून आणले आहे.

पथकाने संशयित आरोपी अशोक विश्वनाथ पवार (वय-२७) (चालक), वाल्मीक साहेबराव सोनवणे (वय-४५) वर्षे दोन्ही रा.पाण्याच्या टाकीजवळ, डेराबर्डी, चाळीसगाव, राहुल रावसाहेब पाटील (वय-३१) वर्षे रा. भोरस खु. हनुमान मंदीराजवळ ता.चाळीसगाव, रविंद्र नागो राजपुत (वय-५२) रा. नवेगाव मेहुणबारे ता. चाळीसागाव, रोशन युवराज मोरे (वय-२३) रा. दसेगांव ता. चाळीसगांव यांच्यासह वाहन व त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना दिपक पाटील, पोशि अमोल भोसले करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button