जळगाव : पुढारी वृत्तसेवा; बोदवड तालुक्यातील शेलवड शिवारात शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या गाडीतून पेट्रोल चोरी करीत असताना विचारणा केली असता दोन जणांना मारहाण करून तीनशे रुपयांचे पेट्रोल चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोदवड येथील इंदिरानगर येथे राहणारे व शेतकरी असलेले हमीद आलम मन्यार यांचे शेलवड शिवारात शेत आहे. 2 जानेवारी रोजी 5.15 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शुभम प्रभाकर वाघ व त्याच्यासोबत एक अनोळखी इसम हे बांधावर असलेल्या मोटरसायकल मधून पेट्रोल चोरी करीत असताना हमीद मण्यार यांच्या पुतण्याने जखमी साजिद नजीमोद्दीन मण्यार याने पेट्रोल चोरी करण्याबाबत विचारपूस केली असता या गोष्टीचा राग घेऊन संशयित आरोपी शुभम वाघ याने मागील बाजूस जोरात मारून दुखापत केली. तर हमीद मणियार हे समजवण्यासाठी आले असताना त्यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारण केली. मनियार यांचा मुलगा अनिस मन्यार हा त्या ठिकाणी आला असता त्यालाही संशयित आरोपीने लाथा बुक्क्याने मारहाण केली व शेतातील पीक जाळून टाकण्याची व ठार मारण्याची धमकी देऊन मोटरसायकल मधील तीनशे रुपये किमतीचे तीन लिटर पेट्रोल चोरून निघून गेले. याप्रकरणी हमीद मन्यार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसांमध्ये संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहे.
चाळीसगाव तालुक्यात असलेल्या एमआयडीसी परिसरातील बायो ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मोकळ्या जागेतून चार लाख दहा हजार रुपयांची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक एमआयडीसी परिसरातून मोंनिसा बायो ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मोकळ्या जागेतून दोन लाख 80 हजार रुपयाची 400 किलो वीज ट्रांसफार्मर मधील तांब्याची तार व एक लाख तीस हजार रुपयाची 180 फूट केबल असा एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रमाणे चाळीसगाव शहर पोलिसांमध्ये सचिन केशवराव नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास दीपक पाटील हे करीत आहे.
तालुक्यातील गट क्रमांक 78 प्लॉट क्रमांक 57 व आवेददर्शन कॉलनी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सव्वा लाख रुपये सोन्या-चांदीचे दागिने घेऊन लंपास झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका परिसरातील गट क्रमांक 78 प्लॉट क्रमांक 57 व हवे दर्शन कॉलनी येथे राहणारे हेमंत देशमुख हे व्यवसायने मेडिकल स्टोअर चालवितात. अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून वरील मजल्यावरील बेडरूम मधील फर्निचर च्या कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 25 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. या प्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास एपीआय आनंद अहिरे हे करीत आहे.
हेही वाचा :