नाशिकमध्ये धडकला बिऱ्हाड मोर्चा, शहर परिसरात सर्वत्र लालबावटा | पुढारी

नाशिकमध्ये धडकला बिऱ्हाड मोर्चा, शहर परिसरात सर्वत्र लालबावटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आदिवासी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीन व जंगल हक्क, शेतमालाला रास्त भाव, दुष्काळग्रस्तांच्या समस्या, भूसंपादन तसेच गायरान हक्कासाठी नंदुरबार येथून निघालेला बिऱ्हाड माेर्चा सोमवारी (दि. १८) नाशिक शहरात धडकला. शहर परिसरात सर्वत्र लाल बावटाच दृष्टीस पडला होता.

महाजन मध्यरात्री आंदोलकांच्या भेटीला

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा संदेश घेऊन मंत्री गिरीश महाजन हे मध्यरात्री आंदोलकांंपर्यंत पोहोचले. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची मांडणी करत मध्यरात्री १२ ते 1.30 दरम्यान त्यांची बैठक सुरू होती. यामध्ये राज्यस्तरावरील मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. इतर मागण्या या जिल्हा स्तरावरील असल्याकारणाने त्याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर निर्णय घेण्यात येणार अशल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले होते.

चार तास मॅरेथॉन बैठक

आंदोलकांनी जोवर निर्णय होत नाही, तोवर आपण मोर्चा थांबवणार नसल्याची भुमिका घेतली होती. त्यामुळे दोन दिवस आडगाव येथील ट्रक टर्मिनसवर थांबलेला बिर्हाड मोर्चा साडेदहा वाजता नाशिककडे निघाला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. ही बैठक तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक चालली.

तीन ते चार किलोमीटर मोर्चा

नाशिक शहरात आंदोलकांचा जेव्हा प्रवेश झाला, तेव्हा आडगाव नाका, निमाणी बसस्थानक परिसर, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, महात्मा गांधी मार्ग, सीबीएसमार्गे गोल्फ क्लब मैदान येथे मोर्चा येऊन थांबला. सकाळी 10.30 वाजता निघालेला मोर्चा हा दुपारी 4 वाजता गोल्फ क्लब मैदानावर पोहोचला. बिऱ्हाड मोर्चा हा साधारण तीन ते चार किलोमीटर सलग असल्याने लक्ष वेधून घेणारा ठरला.

आंदोलकांना परत जाण्यासाठी वाहने

गोल्फ क्लबवरून आंदोलकांना आपापल्या घरी जाण्यासाठी शासनाने वाहनांची व्यवस्था करावी, अशी मागणी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केली होती. ही मागणी मान्य करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गोल्फ क्लबला लाल रंगाचा वेढा

मोर्चेकऱ्यांचे कपडे, झेंडे, सोबतची वाहने सर्व लाल रंगाची असल्याने गोल्फ क्लब मैदानाला लाल रंगाचा वेढा असल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यातच विविध घोषणांनी परिसर दुमदुमला

Back to top button