Sudhakar Badgujar : व्हिडीओत मॉर्फिंग केलं गेलंय, सगळा बेबनाव आहे; बडगुजर यांचे आरोप | पुढारी

Sudhakar Badgujar : व्हिडीओत मॉर्फिंग केलं गेलंय, सगळा बेबनाव आहे; बडगुजर यांचे आरोप

पुढारी ऑनलाइन डेस्क – विधानसभेत बोलताना नितेश राणे यांनी एक फोटो दाखवत सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते? असा सवाल विचारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यांसबधीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यांसदर्भात पत्रकारपरिषद घेत सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

त्या व्हिडीओत मॉर्फिंग केलं गेलंय, हा सगळा बेबनाव असून योग्य माहिती न घेता माझ्यावर आरोप केल्याचे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले आहे. बडगुजर म्हणाले, पालकमंत्र्यांनी सभागृहात जे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत. त्यांनी योग्य माहिती घेतली नाही. 2016 मध्ये विजया राहटकर प्रकणात वेगळ्या विदर्भाची मागणी संदर्भात सभा झाली. त्याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले, त्यात शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. माझ्यावरही गुन्हा दाखल झाला होता. मीही 15 दिवस सेंटर जेलमध्ये होतो. त्यावेळेला तेथे सलीम कुत्ता जेलममध्ये असेल, ते मला माहित नाही. माझी आणि त्याची सार्वजनिक जीवनात कुठे भेट झाली असेल तर तेही आठवत नसल्याचे बडगुजर म्हणाले.

बडगुजर म्हणाले, राजकारणात आल्यापासून माझ्यावर एकही गुन्हा नाही. त्यानंतर जे काही गुन्हे दाखल झाले ते सगळे राजकीय हेतुने गुन्हे दाखल झाले. आता माझ्यासोबत सलीम कुत्ताचे नाव जोडले जात आहे. मात्र, त्यांना 92-93 मध्ये अटक झाली. कैदी म्हणून मी 2016 ला जेलमध्ये होतो. त्यामुळे ते त्यावेळेला जेलमध्ये असतील, मला त्याची कल्पना नाही. मी ठरवून कधीच कुत्ताला भेटलो नाही.

Back to top button