Dhule Pimpalner : कर्म.आ.मा. पाटील महाविद्यालयात एच.आय.व्ही. सप्ताह  | पुढारी

Dhule Pimpalner : कर्म.आ.मा. पाटील महाविद्यालयात एच.आय.व्ही. सप्ताह 

पिंपळनेर, जि. धुळे, पुढारी वृत्तसेवा- कर्म.आ.मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने एच.आय.व्ही. सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. के.डी. कदम यांनी भूषवले. व्यासपीठावर ज्येष्ठ प्रा. डॉ. डब्ल्यू.बी. शिरसाठ, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एल.जे. गवळी, प्रमुख वक्ते डाॅ. हेमंत जाधव व डाॅ. अरुण शहा हे होते.

प्रा. एल.जे. गवळी यांनी सुरुवातीस प्रास्ताविक करतांना एच.आय.व्ही. चा इतिहास सांगितला. ते म्हणाले की, 19 व्या शतकात आफ्रिकेतील माकडांच्या एका विशिष्ट प्रजातीमध्ये एड्सचा विषाणू पहिल्यांदा आढळून आला. मग हा आजार माकडांपासून माणसांमध्ये पसरला. आफ्रिकेमध्ये माकडे खाल्ली जात. म्हणून तो आजार आफ्रिकेतील माणसांना झाला. त्यानंतर हळूहळू सर्वत्र पसरला. 1 डिसेंबर 1988 मध्ये पहिला एड्स दिन साजरा करण्यात आला. लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एड्स या आजारा विषयी जनजागृती व्हावी. या हेतूनेच आज आपण देखील एड्स सप्ताह साजरा करीत आहोत.

तद्नंतर प्रमुख वक्ते डाॅ. हेमंत जाधव यांनी एड्स या जीवघेण्या आजाराबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, एड्स हा अतिशय धोकादायक आजार आहे. या आजारावर आतापर्यंत कोणताही पावरफुल इलाज सापडलेला नाही. हा आजार रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे कमी करतो. हा रोग इम्युनो डेफिसियन्सीमुळे होतो. यामध्ये बहुतेक लोकांचे अवयव काम करणे बंद करतात. आणि इतर आजार त्याच्यावर लगेच अ‍ॅटॅक करतात. तसे म्हटले तर एच.आय.व्ही. बाधीत प्रत्येकाला एड्स होत नाही. मात्र वेळीच औषधोपचार आणि काळजी घेतल्याने आजारावर नियंत्रण ठेवता येते.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात प्र.प्राचार्य के.डी. कदम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या आजारावर उपचार घेण्यापेक्षा हा आजार होणारच नाही, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेच्या पद्धतींचा अवलंब करावा. डाॅ. अरुण शहा यांनी राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांकडून रेडरिबीनचा लोबो तयार करण्याचे यथोचित आयोजन करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार राष्ट्रीय सेवा योजनाचे सहायक कार्यक्रम अधिकारी डाॅ. एस.एन. तोरवणे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

हेही वाचा :

Back to top button