साक्री तालुका मराठी पत्रकार संघाला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार  | पुढारी

साक्री तालुका मराठी पत्रकार संघाला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार 

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाचा नाशिक विभागातून देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी साक्री तालुका मराठी पत्रकार संघ घोषित झाला असून साक्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याची दखल परिषदेने घेतल्याबद्दल पत्रकार संघांचे अध्यक्ष विजय भोसले यांनी परिषदेचे विश्वस्त एस. एम.देशमुख, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष गो.पी.लांडगे, सचिव रोहिदास हाके व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तालुकास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका पत्रकार संघांना विभागस्तरावरून एक अशा आठ विभागातून राज्यस्तरीय पुरस्कार वितरित केले जातात.यावर्षी परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे आज या पुरस्कारांची घोषणा केली. यात नाशिक विभागातून साक्री तालुका मराठी पत्रकार संघाची निवड घोषित करण्यात आली. साक्री तालुका मराठी पत्रकार संघ हा जनआंदोलन,जन चळवळ, सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत नेहमीच पुढाकार घेऊन लेखणीच्या सोबत आंदोलनात्मक भूमिकेतून जनतेचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असतो. गेल्या अनेक वर्षाच्या कार्याची दखल मराठी पत्रकार परिषदेने घेतली याचा सार्थ अभिमान व यापुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरणार असल्याची भावना अध्यक्ष विजय भोसले यांनी व्यक्त केल्यात.

पत्रकार संघाच्या एकूण वाटचालीत संघांचे मार्गदर्शक, मा.अध्यक्ष कॉ.सुभाष काकूस्ते, प्रा.नरेंद्र तोरवणे, प्राचार्य बी.एम.भामरे, सतिष पेंढारकार, लक्ष्मीकांत सोनवणे, रघुवीर खारकार, भटू वाणी, महेंद्र चंदेल, पी.झेड.कुवर, अंबादास बेनुस्कर, दगाजी देवरे, धनंजय सोनवणे, किशोर गाडेकर, सागर काकूस्ते, अमृत सोनवणे, दिनेश वकारे, लतीफ मन्सूरी, सुकलाल सु्यवंशी, रतनलाल सोनवणे, विशाल बेनुस्कर, राहुल सोनवणे, भिलाजी जिरे, हेमंत महाले, योगेश हिरे आदींचे मोलाचे योगदान आहे. सदर पुरस्काराचे वितरण 13 जानेवारी 2024 रोजी लातूर विभागातील नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष गो.पी. लांडगे व सचिव रोहिदास हाके यांनी कळविले आहे. या पुरस्कारात नाशिक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत विजय भोसले यांनी व्यक्त केले.

Back to top button