Onion Export Stop : केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी | पुढारी

Onion Export Stop : केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी

लासलगांव : पुढारी वृत्तसेवा; स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. गेल्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने तसेच काढणीला आलेल्या कांद्याला अवकाळीचा फटका बसल्याने कांदा आवक घटली आहे. पुन्हा कांदा दरावर अंकुश राहण्यासाठी निर्यात बंदी लावली असल्याचे समजते.

हेही वाचा :

 

Back to top button