NAMCO Bank Election : आजी-माजी संचालकांच्या उमेदवारीवर तीन हरकती

नाशिक : हारकतीबाबत आपली बाजू मांडताना संदीप भवर.
नाशिक : हारकतीबाबत आपली बाजू मांडताना संदीप भवर.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक मर्चंट बँकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७८ सभासदांकडून दाखल २७२ नामनिर्देशनपत्रांची सोमवारी सकाळी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात विद्यमान संचालकांसह येवला मर्चंट बँकेतील एका माजी संचालकाच्या उमेदवारीला हरकत घेण्यात आली असून, त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी हे काय निकाल देतात, याकडे बँक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नामको बॅंकेच्या सर्वसाधारण गटातील १८, अनुसूचित जाती-जमातीसाठीची एक, तर महिला राखीव दोन, अशा एकूण २१ जागांसाठी येत्या २५ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी १७८ सभासदांनी २७२ अर्ज दाखल केलेत. या अर्जाची छाननी प्रक्रिया सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी फैयाज मुलानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुपारी २ वाजता तीन हरकती नोंदविल्या गेल्यात. मनसे पदाधिकारी संदीप भवर यांनी, साखर घोटाळ्यात उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेले व रिझर्व्ह बँकेने पारित केलेल्या आदेशनुसार विद्यमान संचालकांचे अर्ज अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. याचप्रमाणे विजय बोरा यांनीदेखील विद्यमान संचालक मंडळाविरोधात हरकत दाखल केली आहे. रिझर्व्ह बँकेने ठोठावलेला ५० लाखांचा दंड संचालक मंडळाने स्वत: न भरता तो बँकेच्या तिजोरीतून भरला. तेव्हा या संचालक मंडळाच्या कारभारच वादादीत ठरत असल्याने विद्यमान संचालकांचे अर्ज अपात्र ठरविण्याची मागणी बोरा यांनी नोंदवली आहे. तर, येवला मर्चंट बँकेचे माजी संचालक मनीष काबरा यांना बँकेच्या नुकसान प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. तेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज कलम ८८नुसार अपात्र ठरवावा, अशी हरकत अशोक संकलेचा यांनी नोंदवली आहे.

या हरकतींविरोधात बँकेच्या वतीने ॲड. जालिंदर तारगे यांनी बाजू मांडली. हरकतीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी फैयाज मुलानी यांनी राखून ठेवला असून, निकाल व वैध नामनिर्देशनपत्राची यादी बुधवारी (दि.६) सकाळी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याकडे बँक घटकांचे लक्ष लागले आहे. दि.६ ते ११ डिसेंबरदरम्यान अर्ज माघारीचा कालावधी असेल.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news