जळगाव: ७ दुचाकींसह चोरटा अटक; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव: ७ दुचाकींसह चोरटा अटक; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अनेक चोरीच्या घटना व मोटरसायकल चोरीला जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले आहे. राकेश पंडीत भाट (वय २४, रा. मोठे वाघोदे, ता. रावेर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी शोध घेत होते. सीसीटीव्ही आणि जनरल फुटेजच्या आधारे चोरटा शहरातील अजिंठा चौकात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे ३० नोव्हेंबररोजी दुपारी ३ वाजता त्याची कसून चौकशी केली असता त्याने सात ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ४, भुसावळ शहरात १, एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ असे एकूण ७ ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, अमितकुमार मराठे, रविंद्र साबळे आणि तुषार पाटील यांनी केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news