World AIDS Day : समुदायाच्या सहभागाने एड्स संपवू या, देवळा येथे जनजागृती रॅली | पुढारी

World AIDS Day : समुदायाच्या सहभागाने एड्स संपवू या, देवळा येथे जनजागृती रॅली

देवळा : पुढारी वृत्तसेवा ;  ग्रामीण रुग्णालय देवळा व राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभाग कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) जागतिक एड्स दिनानिमित्तशहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

उपप्राचार्य बी. के. रौंदळ, उपप्राचार्य पी. एन. ठाकरे, डॉ. डी.के. आहेर (राष्ट्रीय सेवा योजना नासिक जिल्हा समन्वयक) यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. सदर रॅली निमगल्ली, सुभाषरोड, निरंजनगल्ली, सराफ बाजार, पाच कंदिल मार्गे काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “वचन पाळा एड्स टाळा”, “एक दोन तीन चार एड्स करा हद्दपार” यासारख्या घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश आहिरे, समुपदेशक प्रविण देवरे, भूषण खैरनार, भरत पाटील, रविंद्र निकम, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक गुजरे,  प्रा. नीलिमा पाटील, डॉ. राकेश घोडे, प्रा. सचिन भामरे, प्रा. साहेबराव अहिरे, प्रा. शेळके, प्रा. आर. पी. चौधरी, प्रा. आर.एन. निकम, प्रा. खैरनार इ. उपस्थित होते. रॅलीची सांगता कॉलेजच्या प्रांगणात समुपदेशक प्रविण देवरे यांनी शपथ देवून केली.

Back to top button