

पुढारी ऑनलाइन डेस्क; अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता छगन भुजबळ आज आपल्या मतदारसंघात गेले होते. मात्र, याठिकाणी भुजबळांना मराठा जनतेचा रोष पत्करावा लागला. ठिकठिकाणी भुजबळ गो बॅक च्या घोषणा मराठा आंदोलकांनी दिल्या.
येवला तालुक्यातील सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी भुजबळांचा ताफा जाताच गोमुत्र शिंपडून निषेध नोंदवला. यासंदर्भात भुजबळांना एका तरुणाने, आमच्या गावात येऊ नका म्हणून फोन केला होता. त्याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. मात्र त्यानंतरही भुजबळ सोमठाणदेश येथे गेले, यावेळी आंदोलकांनी त्यांना विरोध केला. ज्या रस्त्याने भुजबळ गेले, त्या रस्त्यावर मराठा तरुणांनी गोमुत्र शिंपडत रस्ता पवित्र केला.
मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे भुजबळांना आज त्यांच्या दौऱ्याचा मार्ग देखील बदलवा लागला. येवला शहरातील विंचूर चौफुलीवर देखील मराठा तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भुजबळ विरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळेस एक मराठा लाख मराठा आणि भुजबळ गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या दौऱ्यासाठी भुजबळांना दुसऱ्या रस्त्याने जावे लागले.
युवक : हॅलो, भुजबळसाहेब सोमठाणेदेश येथून बोलत आहे, आमच्या गावात आज तुमचा दौरा आहे, मराठा समाजाच्या वतीने भुजबळसाहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आमच्या गावच्या बांधावर तुम्ही येऊ नका. हात जोडून विनंती.
छगन भुजबळ : बरं ठिकंय, बघू काय करायचे ते
युवक : तुम्ही आले तर उगाच वातावरण खराब होईल साहेब… विनंती आहे तुम्ही येऊ नये.
छगन भुजबळ : बरं… बरं…
युवक : कारण, जमिनीचा सातबारा आमच्या वैयक्तिक बापाच्या नावावर आहे. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला आहे तो बघा, हात जोडून विनंती आहे येऊ नका.
छगन भुजबळ : ते असं आहे की, मला कोणी म्हटलं या, तर मी जाणार, नाही म्हटलं तर पाहू…
युवक : आमच्या सगळ्या गावचा ठराव झालेला आहे. कोणालाही गावात येऊ द्यायचे नाही, त्यामुळे तुम्ही येऊ नका…
छगन भुजबळ : तुम्ही चार लोक म्हणजे ठराव होतो का रे?
हेही वाचा :