जळगाव : तोल गेल्याने इमारतीवरुन पडून परप्रांतीय मजूराचा मृत्यू

जळगाव : तोल गेल्याने इमारतीवरुन पडून परप्रांतीय मजूराचा मृत्यू
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- शहरातील नायरा पेट्रोल पंप परिसरात इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पाचव्या मजल्यावरून पडल्याने एक परप्रांतीय २६ वर्षीय मजूर जागीच ठार झाला. ही घटना काल (दि.26) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात वास्तव्याला सुदाम दिलीप शर्मा (वय-२६) रा. दिनाजपुर पश्चिम बंगाल ह.मु. शिवकॉलनी, जळगाव हा परप्रांतीय तरूण राहत होता.
सुदाम दिलीप शर्मा हा सुदाम पेट्रोल पंप परिसरात इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. नेहमीप्रमाणे  सायंकाळच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असताना  त्याचा तोल जावून पाचव्या मजल्यावरून पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news