Marriages Muhurta : लग्नसराईला सुरुवात, यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त

Marriages Muhurta : लग्नसराईला सुरुवात, यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त

नाशिक  : तुळशी विवाहाच्या समारोपानंतर आज (दि. २७) लग्नसराईला सुरवात झाली आहे. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत विवाहाचे तब्बल ६६ मुहूर्त आहेत. यंदा लग्नसराईचा धूमधडाका असल्याने बाजारातही तेजीचे वातावरण आहे.

लग्नसराईत मंगल कार्यालय, बँड, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स कपडे ऑटोमोबाइल आदी मोठ्या क्षेत्रात उलाढाल होईल, अशी आशा आहे. विवाहासाठी लागणारे घोडा, बम्गी, पुरोहित, हार-फुले सजावट, मंडप, मंगल कार्यालय आदी सर्वच क्षेत्रांना झळाळी येणार आहे.

असे आहेत विवाह मुहूर्त… (दाते पंचांगनुसार)

नोव्हेंबर- २७, २८, २९
डिसेंबर- ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१
जानेवारी- २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१
फेब्रुवारी- १, २, ४, ६, १२, १३, १७, २४, २६, २७, २८, २९
 मार्च – ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०
एप्रिल- १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८
मे- १, २
जून्- २९, ३०
जुलै- ९, ११, १२, १३, १४, १५

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news