उद्योग, शिक्षण, व्यवसाय किंवा प्रदेशात सहलीसाठी किंवा विदेशात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची ओळख पासपोर्ट आहे. जिल्ह्यात दरवर्षी पासपोर्ट होणाऱ्यांची संख्या हजारो ने वाढत आहे. त्याचबरोबर विमान प्रवास प्रथम करणाऱ्यांची संख्या ही वाढत असल्याने पासपोर्ट बनवण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता ऑनलाईन पद्धतीने पासपोर्ट बनवण्यासाठी एप्लीकेशन करणे सोपे झाल्यामुळे पासपोर्टची मागणी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हेरिफिकेशन साठी येणाऱ्या पासपोर्टाची संख्या हजारोच्या संख्येत झालेली आहे. यावर्षी ऑक्टोंबर अखेर 17043 पासपोर्ट धारकांचे व्हेरिफिकेशन झालेले आहे.
शिक्षणासाठी असो की बाहेर फिरण्यासाठी असो पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज केल्यानंतर पासपोर्ट प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते पोलीस व्हेरिफिकेशन यासाठी पासपोर्ट साठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पासपोर्ट विभागाकडून स्थानिक पोलिसांकडे ते व्हेरिफिकेशन साठी पाठवण्यात येते. स्थानिक पोलीस ठाण्यातील यासाठी असलेल्या स्वतंत्र विभागाकडून पासपोर्ट साठी अर्ज केलेल्या व्यक्तीला बोलवून त्याची माहिती घेऊन त्याची पडताळणी केल्यानंतर त्याच्या कागदपत्रांची पाहणी करण्यात येते व त्या पासपोर्ट अर्ज करणाऱ्या व्यक्तीवर काही गुन्हे दाखल आहे का याची सुद्धा माहिती काढण्यात येते त्यानंतर ही संपूर्ण माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागाकडे पाठवण्यात येते.
यामध्ये पासपोर्ट अर्ज करणाऱ्या व्यक्तीची 32 प्रकारची माहिती गोळा करण्यात येते व त्या सर्व माहितीची पडताळून पाहण्यात येते व सदरील अहवाल पुन्हा जिल्हा पोलीस कार्यालयात पाठवण्यात येतो त्यानंतर स्थानिक पोलिसांनी दिलेल्या अहवालावरून जिल्हा पोलीस कार्यालयातील पासपोर्ट साठी व्हेरिफिकेशन रिपोर्ट दिला जातो.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत जिल्ह्यात जवळपास 36 पोलीस स्टेशन आहेत व या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पासपोर्ट कार्यालयाकडून आलेल्या अर्जाची पडताळणी करण्यात येते व सदरची पडताळणी 21 दिवसात करायची असते. मात्र जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातून पासपोर्ट व्हेरिफिकेशन कमीत कमी दिवसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 2021 मध्ये जळगाव जिल्ह्यात 10 713 , 2022 मध्ये 14431 व 2023 चे ऑक्टोबर महिन्यापर्यंत 17043 नागरिकांसाठी पासपोर्टसाठी अर्ज दाखल केलेले व त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हेरिफिकेशन साठी आलेले आहेत. आतापर्यंत या तीन वर्षात 42187 पासपोर्ट साठी व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यात आलेले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पासपोर्ट विभागामध्ये जिल्हा परिषद एम राजकुमार यांनी कामाची सुसूत्रता व्हावी म्हणून दोन कर्मचारी भारतीय पासपोर्टसाठी सहाय्यक फौजदार दिनेश बडगुजर व रवींद्र कापडणे यांना देण्यात आलेली आहे. दोन कर्मचारी विदेशी पासपोर्टसाठी अशी जबाबदारी विभागून देण्यात आलेली आहे. यामुळे पासपोर्ट विभागांमध्ये तात्काळ नागरिकांचे कामे होण्यास सोपे होत आहे.
याबाबत माहिती घेतली असता पोलीस अधीक्षक एम राजकुमार हे प्रत्येक दिवशी पासपोर्ट विभागाकडून आढावा घेत असतात. कमीत कमी वेळेत नागरिकांची कामे व त्यांचे व्हेरिफिकेशन होईल याबद्दल ते मार्गदर्शन करीत असतात .