नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news
जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तीन अल्पवयीन मुलींनी तीन अपत्यांना जन्म दिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व बालविवाहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी १०० अल्पवयीन मुली प्रसूतीसाठी दाखल झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती.

जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.१९) १३ वर्षे ११ महिने व १७ दिवस इतके वय असलेली अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल झाली. तिने सोमवारी (दि.२०) मध्यरात्री मुलीला जन्म दिला आहे. ही बालमाता ओझर (ता. निफाड) परिसरातील आहे. तर दुसऱ्या घटनेतील मुलीचे १७ वर्षे ११ महिने ९ दिवस इतके वय आहे. ती पेठ तालुक्यातील रहिवासी असून, ती १३ नोव्हेंबर रोजी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिने १६ तारखेला एका मुलाला जन्म दिला आहे. तर, तिसरी मुलगी ही चांदवड तालुक्यातील राहुड येथील असून, तिचे १६ वर्षे ५ महिने व २० दिवस इतके वय आहे. या अल्पवयीन गर्भवती मुलीने १३ नोेव्हेंबर रोजी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. मात्र मुलीचे वजन कमी भरल्याने माय-लेकींना १५ नोव्हेंबरला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी ओझर, पेठ आणि चांदवड पोलिस ठाण्यांना माहिती देण्यात आली आहे.

तीन वर्षांत १६५ अल्पवयीन मुलींची प्रसूती

जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल नोंदीनुसार २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात २६, २०२१-२०२२ या कालावधीत ३९ अल्पवयीन मुलींची प्रसूती करण्यात आली. तर २०२२ ते २०२३ या कालावधीत १०० अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर बालमातांचा प्रश्न गंभीर झाल्याचे पाहावयास मिळाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news