Nashik Accident : आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार 

Nashik Accident : आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार 

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा ; आक्राळे फाटा येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक दुचाकी चारचाकीला मागून जावून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात पिंपळनारे येथील दोन युवक जागीच ठार झाले. तुषार भाऊसाहेब खांदवे, राहूल लक्ष्मण खांदवे असे मृत तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी साडेआठ-नऊ वाजेच्या सुमारास नाशिक कळवण रस्त्यावर आक्राळे फाट्या नजीक हा अपघात झाला. दिंडोरीकडून पिंपळनारे येथे जाणाऱ्या बजाज पल्सर )एम एच 15 Eu6547) या दुचाकीस इकोस्पोर्ट वाहन  (एम एच 15 CD 6547) या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने आक्राळे पाट्या नजीक मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकी वरील तुषार भाऊसाहेब खांदवे (वय 20) व राहुल लक्ष्मण खांदवे (वय 30) हे दोन पिंपळनारे येथील युवक जागीच ठार झाले. दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला असून दोन्ही युवकांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी दिंडोरी येथे रवाना केले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news