कळवण, पुढारी वृत्तसेवा : कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला आज (दि.११) सकाळी यश आले. मोराची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत पडला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाळे खुर्द शिवारात योगेश परसराम पाटील यांच्या शेतात विहीर आहे. आज सकाळी पाटील शेतात पाणी देण्यासाठी विहिरीजवळ गेले. यावेळी विहिरीत डोकावून पहिले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत नागरिकांना आणि वनविभागाला माहिती दिली. तत्काळ वन कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पिंजरा मागविला. विहिरीत पिंजरा टाकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले सुमारे ७० फूट खोल विहिरीत जवळपास ४० फूट पाणी असल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा