Drugs News : आणखी एका एमडी गोदामावर छापा | पुढारी

Drugs News : आणखी एका एमडी गोदामावर छापा

नाशिक : शहर पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी सोलापूर येथील औद्योगिक वसाहतीत छापा टाकून एमडी कारखाना उद्ध्वस्त केला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना आणखी एक गोदाम शहर पोलिसांनी उघडकीस आणले. आहे. शुक्रवारी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत एमडी तयार करण्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता.

Back to top button