Nashik : खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा | पुढारी

Nashik : खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

देवळा(जि. नाशिक) : खर्डे ता. देवळा येथे मंगळवारी दि. 31 पासून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. या सकल मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणाला इतर सर्व समाजातील संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

उपोषणस्थळी खर्डे पंचक्रोशीत समाज बांधव आपली हजेरी लावत आहेत. आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी घोषणाबाजी देत आरक्षण मिळत नसल्याबद्दल राजकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दि. 31 रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात आले. आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय समाज बांधवानी घेतला आहे.

खर्डे येथे सुरू करण्यात आलेल्या या साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वाजगांव, शेरी, वडाळा येथील संजय गायकवाड, अमोल आहेर, विनोद देवरे, शैलेंद्र देवरे, दीपक देवरे, धनराज सोनवणे, सुदाम सोनवणे, राकेश देवरे, प्रभाकर देवरे, प्रदीप सोनवणे, गोरख सोनवणे, सुनील देवरे, वैजनाथ देवरे, सागर देवरे, मोती देवरे, दिनेश देवरे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी खर्डे उपसरपंच बापू जाधव, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विजय जगताप, संदीप पवार, माधव ठोंबरे, सचिन गांगुर्डे, शशिकांत ठाकरे, शशिकांत पवार, भाऊसाहेब मोरे उपस्थित होते.

Back to top button