Jalgaon News : मराठा आंदोलनामुळे जिल्ह्यातील 64 बस फेऱ्या रद्द | पुढारी

Jalgaon News : मराठा आंदोलनामुळे जिल्ह्यातील 64 बस फेऱ्या रद्द

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; आरक्षणासाठी मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. जागोजागी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने हिंस्र वळण घेतल्यामुळे याचा फटका महामंडळाच्या लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांनाही बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध आगारांमधून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या 64 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे. यामुळे पाच लाख 64 हजार 131 रुपयांचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, जामनेर बोदवड, चाळीसगाव, चोपडा, यावल, भुसावळ या आगरा मधून राज्यातील सोलापूर, लातूर बारामती, माहूरगड, पुणे, संभाजीनगर, नागपूर, नाशिक अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू असतात. या फेऱ्या सकाळी व दुपारी अशा दोन भागांमधून असल्याने प्रवाशांना सोयीचे होते. गेल्या सात दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे व सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने जळगाव जिल्हा आगर यांनी इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या व लांब पल्ल्याच्या 64 फेऱ्या रद्द केल्या. यामुळे जळगाव जिल्ह्यातील एसटी महामंडळाला पाच लाख 64 हजार 131 रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

यामध्ये जळगाव डेपोतून पुणे चार, नासिक दोन, बारामती दोन, माहूरगड दोन, जामनेर संभाजीनगर आठ, बोदवड संभाजीनगर दोन, पुणे दोन, चाळीसगाव पंढरपूर दोन, सोलापूर दोन, पुणे दोन, चोपडा संभाजीनगर दोन, यावल माहूरगड दोन, पुणे दोन, भुसावळ संभाजीनगर दोन अशा फेऱ्या रद्द झालेल्या आहेत. सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या 42 फे-या रद्दा झाल्या. दुपारी जळगाव चिंचवड चार, जामनेर संभाजीनगर 4, जामनेर चिंचवड दोन, पारोळा चिंचवड दोन, यावल चिंचवड दोन, मुक्ताईनगर संभाजीनगर दोन, मुक्ताईनगर चिंचवड चार, पारोळा पंढरपूर चार अशा फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

याबाबत सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही प्रवाशांना सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बसलेला आहोत. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाचे नुकसान होऊ नये म्हणून या फेऱ्या रद्द करण्यात आलेला आहे. आंदोलन थांबल्यानंतर आम्ही पूर्ववत सेवा सुरू करू..
युवराज साबळे, जळगांव

हेही वाचा :

Back to top button