नाशिक : कणकापूर येथे बांधकाम कामगार व कुटंब आरोग्य तपासणी शिबीर | पुढारी

नाशिक : कणकापूर येथे बांधकाम कामगार व कुटंब आरोग्य तपासणी शिबीर

देवळा(जि.नाशिक) ; कणकापूर येथील राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत असून शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा फायदा व्हावा यासाठी सुरू असलेले काम खरोखरच कौतुकास्पद
असल्याचे प्रतिपादन देवळा नगर पंचायतीचे गटनेते संभाजी आहेर यांनी आज येथे केले.

कणकापूर येथे नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य शिबिर व नोंदणीकृत कामगारांचे बांधकाम कार्ड वाटप व साहित्य वाटपसाठी आयोजित नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी (दि. ३०) रोजी संभाजी आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे माजी सभापती बापू देवरे, देवळा ऍग्रोचे संचालक प्रवीण मेधने, विकास सोसायटीचे अध्यक्ष नामदेव शिंदे, किशोर आहेर, माजी उपसरपंच अॅड. तुषार शिंदे, पत्रकार सोमनाथ जगताप, सरपंच बारकू वाघ, ग्रामसेविका जयश्री आहेर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष व उपसरपंच जगदीश शिंदे यांनी केले तर आभार रवींद्र बर्वे यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button