जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौ-यासाठी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी गेलेले असतानाही जिल्ह्यात शांततेत व सुरळीत नवदुर्गा विसर्जन सुरु आहे. जिल्ह्यात यंदा बुधवार व गुरुवार असे दोन दिवस 1203 नवदुर्गा मंडळाचे व खाजगी दुर्गा मंडळाचे विसर्जन केले जात आहे.
आज गुरुवारी जिल्ह्यात 1001 सार्वजनिक नवदुर्गा मंडळाचे व खाजगी 202 मंडळाचे विसर्जन सुरू झाले आहे. यामध्ये जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत 83, शहर पोलीस स्टेशन अंतर्गत 22, तालुका अंतर्गत 53, अंतर्गत 36, रामानंद पोलीस स्टेशन अंतर्गत 9 असे देवी मंडळाचे विसर्जन होईल.
जिल्ह्यातील नशिराबाद 17, फैजपूर 17, निंभोरा 21, रावेर 24, यावल 130, मुक्ताईनगर ६०, वरणगाव ३४, चोपडा शहर 9, चोपडा ग्रामीण १०, धरणगाव 104 ,अडावद 75, एरंडोल 8, जामनेर 76 ,पिंपळगाव हरेश्वर 36, पहुर 47, चाळीसगाव ग्रामीण २६, भडगाव 28, मेहूणबारे 6 असे जिल्ह्यात नवदुर्गा मातेचे विसर्जन होत आहे.