‘एसआयटी’ चौकशीत दबावामुळे आमची नावे टाकली : एकनाथ खडसे | पुढारी

'एसआयटी' चौकशीत दबावामुळे आमची नावे टाकली : एकनाथ खडसे

जळगांव : पुढारी वृत्तसेवा: गौण खनिज उत्खनन प्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस आल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या संबंधी चौकशीत ‘एसआयटी’च्या अहवालात खडसे परिवारातील कुणाचेच नाव नव्हते. मात्र, राजकीय दबावामुळे अगदी ऐनवेळी आमची नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला. याप्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.

एकनाथ खडसे यांच्या परिवारास गौण खनिज प्रकरणी 137 कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात बोलताना त्यांनी हा आरोप केला. खडसे म्हणाले, माहितीच्या अधिकारामध्ये या प्रकरणाची सर्व कागदपत्रे मिळवण्यात आलेली आहे. एसआयटीने आमचे म्हणणे न ऐकता एकतर्फी निर्णय दिला आहे. एसआयटीची संपूर्ण माहिती ही माहितीच्या अधिकारात घेतली असतात त्यामध्ये आमचे नाव एसआयटीने कुठेच घेतलेले नाही, मात्र शेवटच्या क्षणाला जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्र आले त्यामध्ये आमचे नाव घालण्यात आले असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एसआयटीने केलेल्या तपासात शेवटच्या शब्दात असे म्हटले आहे की, जमीन मालक किंवा गौर कन्स्ट्रक्शन याला जबाबदार धरावे. याबाबत वरिष्ठांना त्यांनी मार्गदर्शन मागितले आहे. मात्र वरिष्ठांनी दबाव आणून गौर कन्स्ट्रक्शन ऐवजी आमचे नावे घातली. हे वाचल्यानंतर लक्षात आले असे खडसे म्हणाले. या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे एकनाथराव खडसे यांनी सागितले.

Back to top button