Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत भद्रकाली माता | पुढारी

Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत भद्रकाली माता

नाशिक : भद्रकाली देवी मंदिर हे नाशिकचे आद्य ग्रामदैवत तर आहेत तसेच एक शक्तिपीठदेखील आहे. संपूर्ण भारतामध्ये देवीचे मूळ ५१ शक्तिपीठ आहे. ही शक्तिपीठ देवीचा म्हणजेच सती पार्वतीचा ५१ विभिन्न अशा अंगांचा भाग पडून निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे वैष्णव देवी (जम्मू आणि काश्मीर), कामाख्या देवी (आसाम), हिंगलाज माता (पाकिस्तान) या शक्तिपीठाधीश देवी आहेत तसेच भद्रकाली देवी (नाशिक) हीदेखील प्रचंड जागृत देवस्थान आहेत. हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे. या ठिकाणी सती पार्वतीचा शरीराचा हनुवटीचा भाग पडला. हनुवटीला संस्कृत भाषेत चिबुक असे म्हणतात. म्हणून या भागाला चिबुक स्थान असेदेखील म्हणतात.

अत्यंत प्राचीन व पौराणिक महत्त्व असलेल्या या देवी मंदिरात यंदाचा वर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने मंदिरात दरवर्षीप्रमाणे मंदिर सुशोभीकरणाचा कामाला वेग आला आहे. मंदिर हे अत्यंत प्राचीन असल्यामुळे खूप नाजूक व काळजीपूर्वक त्याची कामे केली जातात. १७ व्या शतकात मंदिराचे निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवानिमित्ताने मंदिराचे रंगकाम तसेच साफसफाई, स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंदिरात मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. उत्सवनिमित्ताने देवीचे सोन्याचे अलंकार तसेच चांदीचे उपकरणे ही उजळण्याचे कामदेखील चालू आहे. शारदीय नवरात्र महोत्सव अत्यंत धार्मिक व पौराणिक पद्धतीने साजरा करत असल्याने मंदिराचे पुराणिक, उपाध्याय, गुरुजी, मानकरी वेगवेगळ्या पाठशाळा यांनादेखील आमंत्रण करण्यात येत आहे. या काळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, पुराण, मंत्रजागरण, देवीची महाअभिषेक पूजन, सप्तशतीचा पाठ, यज्ञयाग आदी कार्यक्रम करण्यात येते.

हेही वाचा :

Back to top button