धुळ्यात भाजप विरोधात जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन | पुढारी

धुळ्यात भाजप विरोधात जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा, काँग्रेसचे नेते खा. राहूल गांधी यांचा फोटो रावणाच्या रुपात आपल्या सोशल मीडीयावर प्रसारीत केल्याचे धुळ्यात पडसाद उमटले. धुळे जिल्हा काँग्रेस भवनासमोर जिल्हा व शहर काँग्रेसच्यावतीने भारतीय जनता पार्टीचा निषेध आंदोलन करण्यात आला.

नेते खा. राहूल गांधी यांचा फोटो रावणाच्या रुपात कॉम्प्यूटरव्दारा एडीट करुन सोशल मिडीयावर प्रसारीत केला. याचे धुळ्यात पडसाद उमटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या सूचनेने धुळे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनाच्या आवारात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे धुळे जिल्हा शहर निरीक्षक हेमंत ओगले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,  बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे, काँगे्रसचे धुळे तालुका अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पं.स. सदस्य सुरेखाताई बडगुजर, महिला काँग्रेसच्या अर्चना पाटील, बानुबाई शिरसाठ, माधुरी निकम ज्योती इंगळे, छाया पाटील, सरपंच सोनीबाई भिल आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button