धुळे : शेवडीपाडा येथे ज्ञानेश्वरी पारायनाचा समारोप; पगारे, पाटील यांना पुरस्कार | पुढारी

धुळे : शेवडीपाडा येथे ज्ञानेश्वरी पारायनाचा समारोप; पगारे, पाटील यांना पुरस्कार

पिंपळनेर (धुळे) : पुढारी वृत्तसेवा, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप शुक्रवारी (दि. 3) उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार मंजुळा गावित आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीकृष्ण पारधी उपस्थित होते. या सप्ताहाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हापरिषद शाळेत सेवा देत असतांना उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शिक्षक माधव शंकर पगारे आणि उपशिक्षिका देवश्री काशिनाथ पाटील यांचा शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी सरपंच धनाभाऊ ठाकरे, धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुमित्रा गांगुर्डे, माजी उपसरपंच बापू ठाकरे, धर्मा भाऊ ठाकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोटू चौरे आणि बापू ठाकरे, माजी सरपंच साहेबराव चौरे, पोलीस पाटील श्रीकांत ठाकरे आणि शेवडीपाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार भाऊसाहेब देवरे यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button