नंदुरबार : लाच घेताना कनिष्ठ अभियंता जाळ्यात | पुढारी

नंदुरबार : लाच घेताना कनिष्ठ अभियंता जाळ्यात

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत केलेल्या कामांची बिले मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची लाच घेताना लघु पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच पकडले. शहादा येथील तक्रारदाराने ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत तीन कामे पूर्ण केली होती. या कामांची रक्कम देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ अभियंता दिनेश पाटील याने ९५ हजारांची मागणी केली होती. पाटीलने त्यापैकी ७५ हजार रुपये वेळोवेळी घेतले होते. उर्वरित 20 हजार रुपये घेताना, या अभियंत्याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती.

Back to top button