Dengue in nashik : नाशिक बनलेय डेंग्यूचे हॉटस्पॉट, बाधितांचा आकडा ३३१ वर

Dengue in nashik : नाशिक बनलेय डेंग्यूचे हॉटस्पॉट, बाधितांचा आकडा ३३१ वर
Published on
Updated on

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

शहरात डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढला असून, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच डेंग्यूचे ४२९ नवे संशयित रुग्ण आढळल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. संशयित रुग्णांपैकी ७० जणांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले असल्याने, डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा ३३१ वर पोहोचला आहे. (Dengue in nashik )

संबधित बातम्या :

शहरात व्हायरल फिव्हरने थैमान घातले असताना डेंग्यूबाधितांचा वाढता आकडा धडकी भरवणारा ठरला आहे. जुलैपर्यंत शहरात डेंग्यूचे १४४ रुग्ण होते. विशेष म्हणजे ऑगस्टपासूनच पाऊस गायब झाल्याने डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख उतरंडीवर येणे अपेक्षित होते. परंतु ऑगस्टमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिकच वाढत गेला. या महिनाभरात डेंग्यूच्या नव्या ११७ रुग्णांची भर पडली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ९९ रुग्ण होते. यंदा पाऊस कमी असूनही डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढत गेला. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोरदार सलामी दिली. मात्र यामुळे घरपरिसरात ठिकठिकाणी साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडिस ईजिप्ती या प्रजातीच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे डेंग्यू बाधितांचा आकडाही वाढत गेला. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच शहरात डेंग्यूचे ४२९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातही डेंग्यूबाधितांचा आकडा शंभरी पार करणार असल्याचे चित्र आहे. हा सरकारी आकडा असला तरी, खासगी रुग्णालयांमध्येही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. नाशिकमध्ये वाढत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णसंख्येबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने चिंता व्यक्त करत, महापालिका प्रशासनाची कानउघाडणी केली होती. त्यानंतरही डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख वाढताच राहिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत शहरात राबविण्यात येत असलेल्या डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Dengue in nashik )

९१९ नागरिकांना नोटिसा

डेंग्यूच्या डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांवर तसेच डेंग्यूची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आलेल्या सरकारी आस्थापनांना महापालिकेने नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ९१९ जणांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर दररोज १५४१ घरांमध्ये धूर फवारणी केली जात असल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news