नाशिक : पारख प्रकरणातील तिन्ही अपहरणकर्त्यांच्या मागावर पोलिस | पुढारी

नाशिक : पारख प्रकरणातील तिन्ही अपहरणकर्त्यांच्या मागावर पोलिस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील सातपैकी तिघे अद्यापही फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

राजस्थानमधील सहा जण व वाडिवऱ्हे येथील एका स्थानिकाच्या मदतीने पारख यांचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणी गुन्हे शाखा तपास करीत आहे. इंदिरानगर परिसरातून पारख यांचे 2 सप्टेंबरला रात्री बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी इंदिरानगरच्या गुन्हे शाखेने तपास करून वाडिवऱ्हे येथून अनिल खराटेला अटक केली, तर राजस्थानातून तिघांना अटक केली. पारख यांच्याकडून घेतलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीपैकी एक कोटी ३३ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी या टोळीकडून हस्तगत केली. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन, बंदूकही जप्त केली. दरम्यान, या गुन्ह्यातील तिघे आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या तिघांनी पारख यांच्याकडून खंडणीची रक्कम घेतल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा :

Back to top button