

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती शाखा पिंपळनेर आयोजित शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करणे या कार्यशाळेत शहरातील विविध विद्यालयांतील 200 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभागी होऊन कार्यशाळेत प्रशिक्षण घेतले. सदर कार्यशाळा मराठा मंगल कार्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रत्येक विद्यार्थाला शाडू मातीच्या गोळ्यांचे वाटप करून प्रशिक्षक शिक्षक प्रमोद गांगुर्डे व कला शिक्षक योगेश भामरे यांनी प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
त्यात प्रत्येक विद्यार्थ्याने सुंदर अशी बाल गणेश मूर्ती तयार केली. येणाऱ्या गणेशोत्सवात याच मूर्त्यांची स्थापना आपापल्या घरी करू असे विद्यार्थ्यांनी संकल्प केला. प्लास्टर ऑफ परिसच्या मूर्त्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहचते म्हणून शाडू माती पासून मूर्त्यांची स्थापना होणे गरजेचे आहे. जनकल्याण समितीचे दाते उपसरपंच विजय गांगुर्डे, सुपारी हॉस्पिटलचे डॉ.जितेश चौरे, भारतीय जैन संघटनेचे शाखा अध्यक्ष रिखबचंद जैन, आदित्य ग्रुपचे दिनेश पाटील, बालाजी पेंट्सचे तेजस कोठावदे, जनकल्याण समिती शाखा प्रमुख संजय कोठावदे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर दिपप्रज्वल माधव पवार, कन्हैयालाल टाटीया, विनोद गवळे, नितीन राणे, विशाल गांगुर्डे, सुभाष जगताप, आशिष विसपुते, प्रमोद गांगुर्डे, मोहन भामरे, सचिन जाधव, राजेश पाटील, योगेश भामरे, ललित जैन, विजय सुर्यवंशी, सचिन कोठावदे, मयूर बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक, कलाशिक्षक, आणि जनकल्याण समितीचे अनेक कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पवार यांनी केले.