येवला-लासलगाव मतदारसंघातील 46 गावे आज बंद | पुढारी

येवला-लासलगाव मतदारसंघातील 46 गावे आज बंद

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जालना घटनेच्या निषेधार्थ येवला-लासलगाव मतदारसंघातील 46 गावे आज सोमवारी (दि. 4) बंद पाळणार आहेत. सकाळपासून लासलगाव येथे देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

रविवारी (दि.3) माजी आमदार कल्याणराव पाटील व लासलगाव सरपंच जयदत्त होळकर यांच्या अध्यक्षतेखालील मराठा संघाच्या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. ‘जो देईल लक्ष तोच आमचा पक्ष’ यावर आधारित मराठा समाजासह इतर समाजही पाठिंबा म्हणून या बंदमध्ये सहभागी झाला आहे.

सकाळी विंचूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाआरती करून बंदला सुरुवात होईल. त्यानंतर मोर्चा लासलगाव येथील ग्रामदैवत भगरी बाबा मंदिराजवळ येऊन त्यानंतर पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहे. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात येईल.

Back to top button