धुळे: दहिवेलजवळ पलटी झालेला ट्रक जळून खाक | पुढारी

धुळे: दहिवेलजवळ पलटी झालेला ट्रक जळून खाक

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील दहिवेल येथील साईबाबा पेट्रोल पंपाजवळ पलटी झालेला ट्रक आणि पॉली प्रोपोलीन जळून खाक झाले. ही घटना आज (दि. ६) दुपारी चारच्या सुमारास घडली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकबाहेर उडी मारली.

पिंपळनेरपासून १५ किमी अंतरावरील दहिवेल येथे सुरतहून धुळ्याकडे जाणारा ट्रक साईबाबा पंपाजवळ पलटी झाला. त्यानंतर ट्रकने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप घेतल्याने कॅबीन मधील पॉली प्रोपोलीन जळून खाक झाले. ट्रक चालकाने ट्रक बाहेर उडी मारली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता.

हेही वाचा 

Back to top button