धुळे : शासकीय योजनांची माहिती देण्यासाठीे लवकरच मेळाव्याचे आयोजन : विभागीय आयुक्त-गमे | पुढारी

धुळे : शासकीय योजनांची माहिती देण्यासाठीे लवकरच मेळाव्याचे आयोजन : विभागीय आयुक्त-गमे

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
शासनाच्या प्रत्येक विभागाच्या योजनांची माहिती दुर्गम भागातील नागरिकांना होण्यासाठी लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात’पेन्शन आपल्या दारी’अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

तालुक्यातील मौजे नांदर्खी येथील शासकीय आश्रमशाळा, उमरपाटा येथे महसुल सप्ताहानिमित्त’एक हात मदतीचा’या कार्यक्रमात गमे बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, प्रातांधिकारी रविंद्र शेळके, तहसिलदार साहेबराव सोनवणे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, अपर तहसिलदार दत्तात्रय शेजुळ, पंचायत समिती सभापती शांताराम कुवर, जिल्हा परिषदेचे सदस्य छगन राऊत, गाजऱ्या वळवी, सरपंच रमेश कुवर आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, रेशन कार्ड देण्यात येते. तथापि त्याचा उपयोग त्यांना कशासाठी, हे माहित नसते. यासाठी विविध योजनांची एक यादी तयार करून संबंधित विभागामार्फत लाभ देण्यासाठी करण्यात येईल. योजनांची माहिती नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी मेळावे घेण्यात येतील. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या पेन्शन नागरिकांना बँकेत जावे लागू नये म्हणून ‘पेन्शन आपल्या दारी’ अभियान जळगाव जिल्ह्याच्या उपक्रमावर आधारीत राबविण्यात येणार आहे. नेटवर्कची सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवीन टॉवर उभारणी करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यंत्रणेला दिल्यात. नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार अपडेशन तसेच मतदार नोंदणी, संजय गांधीयोजनेच्या लाभ देण्यासाठी कॅम्पचे ण्यात आले. या कॅम्पचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, यावर्षी शासनाच्या आदेशान्वये १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसुल सप्ताह साजरा होत आहे.त्यानुसार ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत महसुल विभागामार्फत दाखले व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळण्यासाठी पात्र लाभाथ्याकडून विविध यंत्रणेच्या माध्यमातून लाभाचे अर्ज भरुन घेण्यात येतील. महसुल विषयक योजनांची माहिती पुस्तिका दिली जाईल असे गोयल म्हणाले. महसूल विभागात पारंपरिक पद्धतीने चालणारे कामकाज आता कालबाह्य झाले असून तंत्रज्ञानाच्या मद तीने लोकाभिमुख व गतिमान झाले आहे. त्यामुळे सातबारा काढणे,सातबारा वरील बोजा कमी करणे, वारसांची नोंद करणे, सातबारात दुरुस्तीसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावे ही. ई-हक्क प्रणालीमुळे आपल्याला घरी बसूनच अर्ज करता येतील. नेटवर्क नसल्यास फेरफारसाठी सेतू सेवा केंद्रात जावून या प्रणालीचा लाभ घेता येईल. सप्ताहानिमित्ताने आरोग्य शिबि, मतदार नोंदणी संजय गांधी योजनाची लाभ देणे, ई-चावडी,ई-पिक पाहणी,ई पंचनामा करण्यासाठी कॅम्प घेण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेले लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका वाटप, अधिवास प्रमाणपत्र भूविकास बॅॆक बोजा कमी करुन दुरुस्त सातबारा उतारा वाटप वारस नोंद प्रमाणपत्र तसेच विविध योजनेच्या लाभ प्रमाणपत्राचे वितरण तसेच आश्रम शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत तीन शेतकऱ्यांना रोटाव्हेटर,चॉप कटर,तसेच नविन ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तहसिलदार साहेबराव सोनवणे यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी देवेंद्र शेळके यांनी मानले.

Back to top button