नाशिक : शस्त्रक्रिया करायची होती उजव्या पायाची, डॉक्टरने कापला डावा पाय | पुढारी

नाशिक : शस्त्रक्रिया करायची होती उजव्या पायाची, डॉक्टरने कापला डावा पाय

नाशिक : रुग्णावर चुकीचे उपचार करून त्याला दुखापत केल्या प्रकरणी नाशिकरोड येथील डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष काशीनाथ खेलुकर (५९, रा. दसक गाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या उजव्या पायातील रॉड शस्त्रक्रियेमार्फत काढायचा होता. त्यासाठी ते नाशिकरोड येथील एका रुग्णालयात मे महिन्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले हाेते. मात्र तेथील डॉ. विपुल काळे यांनी उजव्या पायाऐवजी डाव्या पायाच्या गुडघ्यावर कापून जखम करून टाके घातले. त्यामुळे खेलुकर यांना चालणे असह्य झाले असून, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचे खेलुकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात डॉ. काळेंविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button