नाशिक : जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. महसूल विभागामार्फत जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्यावेळी पूर्ण करुनत्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसारकरुन महसुल वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, महसुल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे.

1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी नाशिक जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहात मंगळवार 1 ऑगस्ट रोजी 26 जाने ते 30 एप्रिल याकालावधीत राबविलेल्या महाराजस्व अभियान’ अंतर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन विभागनिहाय उत्कृष्ट काम करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अवल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा गौरविण्यात येई,. 2 ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ असून यात दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्नाचा दाखला, नॉन- क्रिमिलेअर आदी प्रमाणपत्रांचे वाटप होईल. 3 ऑगस्टला ‘एक हात मदतीचा’ क कार्यक्रम होईल. यात अवकाळी, अतिवृष्टी, पूर यातील बाधितांना नुकसान देय याचा आढावा घेतला जाईल. 4 ऑगस्टला ‘जनसंवाद’ मध्ये महसुल अदालत होईल. तसेच ‘आपले सरकार’ या पोर्टलवर प्राप्ततक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढण्यात येतील. 5 ऑगस्टला ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम होईल. 6 ऑगस्टला ‘महसुल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्तअधिकारी, कर्मचारी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन होईल. 7 ऑगस्टला ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ होईल. या सप्ताहात सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button