नाशिक क्राईम : पादचारी वृद्धेची सोनसाखळी ओरबाडली | पुढारी

नाशिक क्राईम : पादचारी वृद्धेची सोनसाखळी ओरबाडली

नाशिक : पादचारी वृद्धेची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना गंगापूर रोड परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी अनिल खैरनार (६५, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) या रस्त्याने पायी जात हाेत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी खैरनार यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातून दोन दुचाकी लंपास

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन जाधव (२०, रा. अमृतधाम, पंचवटी) याची दुचाकी (एमएच १५, एफजी ८४०४) सीजीएम कोर्टाच्या समोरील पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तर भरत फकिरा फनसे (५२, रा. एकलहरा, नाशिकरोड) यांची दुचाकी (एमएच १५, सीएल ३७९४) राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी लांबविली.

हेही वाचा :

Back to top button