नाशिक : सप्तशृंगीगड घाटात एस. टी. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे, तर या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील गणतपी घाटात प्रवासी बसला अपघात झाला आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट 400 फुट दरीत कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. वीस जण जखमी आहेत.
हेही वाचा :