नाशिक: बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा रागातून महिलेचा खून | पुढारी

नाशिक: बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा रागातून महिलेचा खून

चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी गावाच्या शिवारात राहत असलेल्या बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याच्या संशयातून अल्पवयीन भावाने ३२ वर्षीय महिलेवर धारदार शस्राने हल्ला केला. त्यानंतर स्कार्पच्या सहाय्याने गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने १०० फूट लांब ओढत नेऊन मृत महिलेच्या मृतदेहावर ऊसाचे पाचट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेबाबत मृत महिलेच्या पतीने वडणेरभैरव पोलिसांत फिर्याद दिल्याने अल्पवयीन भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा खून दिवसाढवळ्या घडल्याने धोंडगव्हाणवाडी पंचक्रोशीतील नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा 

Back to top button