

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ७० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी संदीप जैन यांनी फिर्याद दिल्याची माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बळसाणे गावातील विमलनाथ भगवान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी रात्री दोनच्या सुमारास फोडली. त्यातील ७०हजार रुपये चोरुन नेले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. परंतु चोरट्यांचा मागमूस लागला नाही.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे तपास करत आहेत.
हेही वाचा