आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले | पुढारी

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : बुलढाण्यात खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतरांची स्वप्न भंग करणे योग्य होणार नाही, असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी लगवला आहे. बुलढाणा येथील अपघाताच्या घटनेनंतर आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

खडसे म्हणाले, “समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. परंतु अलीकडचं चित्र बघितले १०० दिवसात अनेकांचा स्वप्न भेग झाली आहेत. आजचा अपघात हा फारच दुर्देवी अपघात असून समृद्धी महामार्गवर आतापर्यंत नऊशे अपघात झाले आहेत. या अपघातात जे मृत झाले त्यांना मी श्रध्दांजली वाहतो. परंतु, राज्य सरकारने या अपघातांची कारणे शोधली पाहिजे. याठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी तात्काळ उपायोजना केल्या पाहिजेत.  राज्यात चौपदरी, सहापदरी असे अनेक मोठ मोठे महामार्ग तयार करण्यात आले. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूवी टिप्पणी केली आहे. रस्ते प्राधिकरणाच्या नियमांचे पालन केले जात नाही. यासंदर्भात नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे, असेही आमदार खडसे म्हणाले.

हेही वाचा

Back to top button