Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी ११,९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी ११,९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी उत्सुकता लागलेली पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि. २१) जाहीर झाली. या फेरीसाठी ११ हजार ९५३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यामध्ये कला शाखेतील १,७९८, वाणिज्य शाखेच्या ३,८७४, विज्ञान शाखेच्या ६,१९३ तर, एचएसव्हीसी शाखेच्या ८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना येत्या शनिवार (दि.२४) पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

शहरातील ६४ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या २६ हजार ७२० जागांसाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामध्ये कला शाखेच्या ४,४००, वाणिज्य शाखेच्या ७,५५७, विज्ञान शाखेच्या ९,४९८ तर एचएसव्हीसी शाखेच्या ९०७ जागांचा समावेश आहे. पहिल्या गुणवत्ता यादीसाठी ११ हजार ९५३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात राज्य शिक्षण मंडळाच्या ११ हजार ५०, सीबीएसई बोर्डाच्या ३७२ तर इतर ३९७ विद्यार्थ्याची वर्णी लागली आहे.

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत विज्ञान शाखेचा खुल्या प्रवर्गातील सर्वाधिक कटऑफ ४१४ गुणांसह एचपीटी-आरवायके महाविद्यालयाचा लागला आहे. वाणिज्य शाखेत सर्वाधिक कटऑफ बॉइज टाऊन कनिष्ठ महाविद्यालयाचा (३८७) तर कला शाखेत सर्वाधिक कटऑफ एचपीटी महाविद्यालयाचा (३७१) लागला. ८,५७४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १,५९३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या तर ७४० विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. दरम्यान, पहिल्या यादीत ईडब्ल्यूएस प्रवर्गातील सर्वाधिक ६,१३८ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. त्या खालोखाल ओबीसी (२,२१०), अनुसूचित जाती (१,६७८) अनुसूचित जमाती (८६६) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.

महाविद्यालयनिहाय कटऑफ

महाविद्यालय-कला-वाणिज्य-विज्ञान

एचपीटी-आरवायके-३७१-०००-४१४

बीवायके-०००-३८२-४०७

बॉइज टाऊन-०००-३८७-४१०

केटीएचएम-३५८-३२६-३७८

केव्हीएन नाईक-३२७-३११-३८७

पंचवटी-३२०-३००-२३०

नाशिकरोड बिटको-२६२-३२८-३४९

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news