नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा | पुढारी

नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

वणी शहरातील मध्यवर्ती भागात भूमीगत गटारींचे पहिलेच काम करण्यास आले. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा सर्व गटारींचे पाणी रस्त्यावर आले आहे. भुमीगत गटारातून पाणी प्रवाहित होतच नाही अशी ओरड ग्रामस्थ करत आहे.

रविवार (दि.४) रोजी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे येथील गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. भाजीपाला विक्री करणा-या महिलांची मोठी तांराबळ उडाली. सर्व घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी वाढली. तर काही भागात भुमीगत गटाराचे काम वरखाली झाले आहे. गटारासाठी बांधलेले चेंबर जमिनीच्यावर बांधले गेले आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्या ठिकाणी भुमीगत गटार न करता दुस-याच बाजूला गटारीचे काम केल्याने गटाराचे संपूर्ण पाणी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात आले आहे.

वणी www.pudhari.news

भुमीगत गटाराचे काम करत असतांना येथील स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होता नियोजन करून भुमीगत गटारी करा. परंतु ठेकेदाराचे आडमुठे धोरण तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना विचारात घेऊन काम करणे आवश्यक होते. कामाचा अभियांत्रिकी आराखडा नाही. आजूबाजूस असलेल्या गटारींच्या पाण्याचा निचरा होणे अपेक्षित आहे. परंतु तसे काही न करता भुमीगत गटारी करायच्या म्हणून करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. पावसाळा सुरू होण्या अगोदर दर्जाहिन कामाची प्रचिती वणी ग्रामस्थांना आली आहे. भुमीगत गटारांचे पाईप टाकतांना पिण्याच्या पाईप लाईनचे पाईप काही दबले गेले आहेत.

वणी www.pudhari.news

नियोजन शून्य कारभार असल्याने या भागातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल आहे. विकास कामानां विरोध नाही परंतु फक्त ठेकेदार पोसण्याचे काम सुरु असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात घाण साचली असून दुर्गंधी वाढली आहे. तरी देखील ग्रामपंचायतचे कोणीही या परिसरात फिरकले नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. भुमीगत गटारीचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रारी येत असल्याने शाखा अभियंता पंचायत समिती दिंडोरी यांच्या कामाचा दर्जा तपासून चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच वणी ग्रामविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष काम कसे झाले ते पाहणे गरजेचे असून ग्रामस्थांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. असेही नागरिक सांगत आहेत.

वणी www.pudhari.news

हेही वाचा:

Back to top button