खासदार अमोल कोल्हेंचे नाव घेऊन फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबाद, पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार आमचा अपघात झाला आहे, आम्हाला मदत द्या डिझेल साठी जेवणासाठी पैसे द्या; अशी खोटी कहाणी रचून आणि खासदार अमोल कोल्हे यांचे नाव सांगून गंडा घालणाऱ्याचा आज चक्क पोलिसांशी पंगा घेतला आणि सतर्क राहणाऱ्या नंदुरबार पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला. या गंडा घालणाऱ्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.