जळगाव एसबीआयमध्ये सशस्त्र दरोडा, लाखो रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लूटले

जळगाव : शहरात गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागातील शाखेत भरदिवसा बँकेवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी शहरातील स्टेट बँकेत घुसून चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लुटून नेत पळ काढला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज (दि. 1 जून) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नियमितपणे कारभार सुरु झाला होता. इतक्यात दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी दोघा तरुणांनी बँकेत घुसून कोयत्याने मॅनेजरवर हल्ला चढवत सुमारे 17 लाखांची रोकड तसेच लाखोंचे सोने लुटल्याची माहिती समोर आली आहे.
- Mahadevrao Jankar: पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार!’त्या’ वक्तव्यानंतर महादेवराव जानकरांची स्पष्टोक्तीघटनास्थळी पोलिसांकडून पाहणी…
या दरोडेखोरांनी शस्त्राच्या व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केला. यानंतर कोयत्याचा धाक दाखवत त्यांनी बँकेतील रोकड घेऊन तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी भेट देऊन पाहणी केली याप्रकरणी पोलिसांनी पथक नियुक्त करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली आहेत.
हेही वाचा :
- Domestic Flight Rate : अबबSS दिल्ली-मुंबई विमान प्रवास दिल्ली-दुबई पेक्षा जास्त महाग! देशांतर्गत विमान प्रवास भाडे अचंबित करणारे
- राज्यात ४ जूननंतरच पाऊस, तोपर्यंत उष्णतेची लाट | Monsoon Update, Heatwave in Maharashtra
- राज्यात ४ जूननंतरच पाऊस, तोपर्यंत उष्णतेची लाट | Monsoon Update, Heatwave in Maharashtra