नाशिक : भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात; एक ठार, ४ जखमी  | पुढारी

नाशिक : भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात; एक ठार, ४ जखमी 

कळवण : (जि. नाशिक)  पुढारी वृत्तसेवा

कळवण तालुक्यातील गोसराने फाटा येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट झाडावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत कारमधील एकजण ठार तर 4 जण जखमी झाले.

अभोणा येथील लग्नसमारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना कळवण तालुक्यातील गोसराने फाटा येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी नंबर (MH १५ HG ३४०८)  झाडाला धडक देऊन कारमधील १ ठार तर ४ जखमी झाली आहेत.

जखमींना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोसराने फाटा अपघाताचा केंद्र बिंदू बनले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपयोजना करून गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. या अपघातामध्ये धनराज वाघ (२१) मयत झाला आहे. तर किशोर बोरसे, गोरख बोरसे, किशोर वाघ, दिनेश बोरसे, भावेश बोरसे हे जखमी झाले आहेत. जखमींवर उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अभोणा पोलिसांत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल हुन जखमींना अभोणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Back to top button