दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

मेंढीपालन
मेंढीपालन

नाशिक (वावी) : संतोष बिरे
कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणारे नाशिक जिल्ह्यातील व्यंकटेशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून प्रथमच शेळी, मेंढीपालन नाशिक ते दुबई एक्स्पोर्ट नुकतेच करण्यात आले.

ओझर विमानतळावर एक हजार शेळी-मेंढी, बोकड दुबईसाठी रवाना झाले. अजून 30 हजार शेळी, मेंढ्यांची मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेतीपूरक असल्याने सर्व मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यापुढे मोठ्या प्रमाणात एक्स्पोर्ट करण्यावर भर देण्यात येईल, असे व्यंकटेशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत सांगण्यात आले. त्यामध्ये शेळी, मेंढीपालन करणारे मेंढपाळ बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते ओझर विमानतळावर दाखल होते. यामध्ये खासदार विकास महात्मे, शिवाजीराव डोळे, विनायक काळदाते, प्रहार जिल्हा सरचिटणीस समाधान बागल, तहसीलदार कुवर, विवेकानंद वाघ, ज्ञानेश्वर ढेपले, अण्णासाहेब सापनर, वैभव रोकडे, भूषण जाधव आदींसह मेंढपाळ बांधव, व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र असो वा राज्य सरकारच्या वतीने शेळी- मेंढीपालन व्यवसायासाठी काहीअंशी अनुदानावर व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, त्यानंतरचे पालनपोषण व विक्री करण्याचे धोरण शासनाकडे नाही. पाच ते सात महिन्यांपर्यंत सांभाळलेला बोकड, त्यासाठी पालनपोषणासाठी येणारा खर्च व विक्री खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याने पशुपालक नेहमीच अडचणीत सापडतो. त्यामुळेच या सोसायटीमार्फत दुबईसह विविध देशांमध्ये शेतकरी अथवा शेळी-मेंढी पालक यांना व्यंकटेशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सभासद करून दुबईसह बाहेरच्या गल्फ कंट्रीमध्ये या व्यवसायास मोठी मागणी असल्याकारणाने शेळ्या व मेंढ्यांची निर्यात सुरू केली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी डोळे यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news