नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू | पुढारी

नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात मंगळवारी (दि.९) वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी एका मृताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत संतोष नारायन कांबळे (३०, रा. पाथर्डी शिवार) याचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. बाळू कांबळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संतोष मद्याच्या नशेत विहीरीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला. दुसऱ्या घटनेत दिपाली ताजणे (३०, रा. राजीवनगर) यांचा विहरीत बुडून मृत्यू झाला. राजाराम ढेमसे यांच्या शेतातील विहरीत दिपालीचा मृतदेह आढळून आला. दिपाली मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही घटनांचा तपास इंदिरानगर पोलिस करीत आहे. तिसऱ्या घटनेत राजाराम नेपाळ निसाळ (३५, रा. बिहार, सध्या रा. रामकुंड) याचा गांधी तलावात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि.९) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत. चौथ्या घटनेत अमृतधाम परिसरातील पाटात अंदाजे ५० ते ५५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button