Nashik : नगरसुल येथील श्री कालभैरव यात्रा उत्सवात | पुढारी

Nashik : नगरसुल येथील श्री कालभैरव यात्रा उत्सवात

नगरसुल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील नगरसुल येथील नांदगाव रोडवरील पुरातन श्री. कालभैरव महाराज मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात, हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडली.

सकाळी गावातून गंगाजल कावडी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशे, संबळ वादन व तुकडीच्या वाद्यामुळे माहोल चांगलाच रंगला. कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यात्रेची शोभा वाढवली. गावच्या मुख्य रस्त्याने व चौकाचौकातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक घरातील महिलेने पालखीचे पुजन करुन कावाडीचे दर्शन घेतले. मिरवणूक व पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर श्री कालभैरवनाथ यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.

यादरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी भाविकांना मनोरंजनासाठी सामाजिक प्रबोधनपर तमाशा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठी गर्दी जमली होती.

हेही वाचा : 

Back to top button