नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू | पुढारी

नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील शालेय तरुणीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार डोंगरगाव येथील गोकुळ फड यांची मुलगी ऋतिका गोकूळ फड (१६) दहावी इयत्तेत शिकत असून ती सोमवारी, दि.2 सकाळी सहाच्या दरम्यान शतपावली करण्यासाठी शेततळ्याकडे गेली होती. मात्र, तिचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली.  पाण्यात बुडून सकाळी अकराच्या सुमारास तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती डोंगरगावचे पोलीस पाटील संजय महादू वाघ यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिली. लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button